सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत
सरपंच पदाचे आरक्षण;
16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत
बुलढाणा, (जिमाका) दि. 2 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या
सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम
30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार
सन 2025 ते 2030 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच
पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार
हे निश्चित करणार आहे.
तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत
स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 25 एप्रिल रोजी स.
11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित
करण्यात आली आहे. तरी याबाबतची सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच
नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000000
Comments
Post a Comment