केस व नख गळती प्रकरण: केंद्रीय पथकाची बोंडगावात भेट व रुग्णांची तपासणी
केस व नख गळती
प्रकरण: केंद्रीय पथकाची बोंडगावात भेट व रुग्णांची तपासणी
या पथकात ICMR, राष्ट्रीय रोग
नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे
त्वचारोग तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र (हरियाणा), प्लांट क्वारंटाईन
विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव
व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले
असून, गावोगावी जाऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आजाराच्या मूळ कारणाचा
शोध घेत आहे.
ही कारवाई आजाराच्या स्रोताचा
शोध घेऊन योग्य उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करण्यात महत्त्वाची ठरणार
आहे.
000000
Comments
Post a Comment