मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

 मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मलकापूर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान मलकापूर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, मलकापूर येथे सोडत काढण्यासाठी सभा आयोजित करण्यात  आले आहे.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत महिलांकरीता आरक्षण सोडत दि. 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे सूरु होणार असून उपविभाग मलकापुर अंतर्गत मलकापूर तालुक्याचे महिलांकरीता आरक्षण सोडत  दुपारी 2.00 वाजता निश्चीत करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडतीकरीता मलकापूर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मलकापूर तहसिलदार आर.एम.तायडे यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या