समता पंधरवाडात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

 

समता पंधरवाडात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

               बुलढाणा,दि.9 (जिमाका) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष मोहिमेंतर्गत 670 विद्यार्थ्यांनाचे जात वैधता प्रमाणपत्राचे ऑनलाईन वितरण व 75 त्रुटीची पुर्तता समता पंधरवडाच्या पहिल्या सप्ताहात करण्यात आले.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा कार्यालयातर्फे दि. 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत "समता पंधरवाडा" विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पंधरवाडाच्या पहिल्या सप्ताहात (दि. 1 ते 7 एप्रिल 2025) या कालावधीत राज्यातील 11 व 12 वी विज्ञान शाखेतील 2025-26 मधील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच त्रुटीची पुर्तता करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेचे ई-मेल आलेले आहेत अशा 75 अर्जदारांनी त्रुटीची पुर्तता करुन ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे. तसेच विज्ञान शाखेतील 2025-26 मधील 11 व 12 वीच्या 670 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले आहे.

जिल्ह्यातील 11 व 12 वीच्या विज्ञान शाखेतील व डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील सन 2025-26 मधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, माया केदार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या