खामगाव शासकीय औद्योगिक संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

 

खामगाव शासकीय औद्योगिक संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

बुलढाणा, दि. 17 (जिमाका): राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी सतगुरु श्री. आगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव येथे सोमवार दि. 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.डी. गंगावणे यांनी केले आहे.

इलेक्ट्रसियन, फिटर, फाउंड्रमन, मॅकनिस्ट, मॅकनिस्ट ग्रिंडर, मॅकेनिक डिझेल, मॅकनिक मॅकट्रानिक्स, मॅकनिक मोटर व्हकेल, मॅकनिक मशिन टूल मेंटन्स,पेंटर जनरल, शिट मेट वर्कर, टूल अँड अम्प डाई मेकर, ट्रनर, वेल्डर, सिएनसी अँड अम्प व्हीएमसी ऑपरेटर ह्या व्यवसायातुन 2021, 2022, 2023, 2024 आयटीआय उत्तीर्ण असलेल्या व सध्या सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षात प्रवेशित उमेदवारांनी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या