मिशन लक्ष्यवेध अतंर्गत खाजगी अकादमी सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मिशन लक्ष्यवेध अतंर्गत खाजगी अकादमी सक्षमीकरणासाठी आर्थिक
सहाय्य; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : राज्य शासनाने मिशन लक्ष्यवेध अंतर्गत
निवड करण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग,
शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारात दर्जेदार खेळाडू
निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अश्या संस्थांचे सक्षमीकरण करण्यात
येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील खाजगी अकादमींनी/संस्थांनी प्रस्ताव सादर करावा. असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानगर यांनी केले आहे.
राज्यात क्रीडा
संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार
करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय
क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरीता राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण
यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन,
खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता
विकासासाठी देशी/विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या
उद्देशाने महाराष्ट्र शासनाने "मिशन लक्ष्यवेध या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी
राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मिशन लक्ष्यवेध
अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस,
रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारांच्या
राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे
सक्षमीकरण करण्यात येणार आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य
करावयाच्यादृष्टीने संबधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक,
प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा, साहित्य व क्रीडा अकादमीच्या
कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’वर्ग,
51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’वर्ग व 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था
‘अ’वर्ग अश्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’वर्ग अकादमींना वार्षिक रु.10
लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक रु.20 लक्ष व ‘अ’वर्ग अकादमींना वार्षिक रु.30 लक्ष
आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक
मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानुसार
जिल्ह्यातील इच्छुक संस्थांनी अर्जाच्या विहीत नमून्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे संपर्क साधावा व सदर योजनेचा जास्तीत जास्त
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे करण्यात
आले आहे.
000000
Comments
Post a Comment