DIO BULDANA NEWS 24.08.2023

 जिल्हा परिषदेच्या अनुकंपाधारकांची यादी प्रसिद्ध 

बुलडाणा, दि. 24 : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अनुकंपाधारक उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असल्यास दहा दिवसांच्या आत आक्षेप नोंदविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेची सन 2023 साठी अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारित ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या ZPBULDANA.MAHARASHTRA.GOV.IN या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती ज्येष्ठता यादीवर संबंधितांकडून लेखी आक्षेप मागविण्यात आले. प्राप्त आक्षेपाची पडताळणी करुन अंतिम ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. अंतिम ज्येष्ठता यादी दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम ज्येष्ठता यादीवर आक्षेप असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत या कार्यालयास लेखी सादर करावेत. सदर अंतिम यादीवर विहित मुदतीत आक्षेप प्राप्त झाले नसल्यास सदर यादी अंतिम समजण्यात येणार आहे. याची सर्व अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या