Monday 14 August 2023

DIO BULDANA NEWS 13.08.2023

 मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन

*जिल्ह्यात आज आगमन
बुलडाणा, दि 13 : मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे सोमवारी, दि. 14 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. श्री. पाटील स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन करतील.
श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार सोमवारी, दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. 
मंगळवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता बुलडाणा येथून अमळनेरकडे प्रयाण करतील.
00000
बुलडाणा कृषि विज्ञान केंद्रात आज रानभाज्या महोत्सव
बुलडाणा, दि. १३ : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा आणि तालुका कृषि अधिकारी बुलढाणा यांच्यातर्फे रानभाजी सप्ताहांतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन सोमवार, दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी बुलडाणा येथील कृषि विज्ञान केंद्रात करण्यात आले आहे. 
महोत्सवात विविध रानभाज्या प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच रानभाज्यांची पाककृती विषद करण्यात येईल. महोत्सवाचे उद्धाटन सकाळी ११ वाजता आमदार संजय गायकवाड, अमरावती विभागाचे पालक कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ. श्रीमती भवटे पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन करतील.
नागरिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, तसेच पौष्टिक राजभाज्याविषयी माहिती जाणून घेऊन रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
00000

No comments:

Post a Comment