Monday 7 August 2023

DIO BULDANA NEWS 05.08.2023

 सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. ५ : ऑगस्ट महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील, असे पाठवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी कळविले आहे.
000000
अर्थव्यवस्था अभियानातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती
बुलढाणा, ५ : खाण आणि पोलाद मंत्रालय, जेएनएआरडीडीसी, नागपूर आणि नाल्को, एनएमडीसी आणि एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्यावतीने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
विभागप्रमुख डॉ. पी. जी. भुक्ते, जेएनएआरडीडीसीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मोहम्मद नजर यांनी मेटल रिसायकलिंग आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबाबत सादरीकरण केले. कार्यक्रमाला तहसीलदार रुपेश खंडारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, सुकेश झंवर, शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली उबरहंडे उपस्थित होते. लहान मुलांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उपक्रमाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. या कार्यशाळेत 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वोत्कृष्ट पाच प्रदर्शन आणि रेखाचित्रांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
जेएनएआरडीडीसीच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीमती आर. विशाखा यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सवांतर्गत पर्यावरणासाठी टिकाऊपणा, जीवनशैलीवर आधारित आहे. मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर विदर्भातील 11 जिल्ह्यातील 22 शाळांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुलडाणा येथे दहावा कार्यक्रम पार पडला. यात सहकार विद्या मंदिर, माल विहिर आणि सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
00000

No comments:

Post a Comment