Thursday 3 August 2023

DIO BULDANA NEWS 03.08.2023

 


जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 3 :  जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

तहसीलदार संजीवनी मोफळे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रिया सुळे, गजानन मोतेकर, हरिदास थोलबरे, सिद्धू परिहार यांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले.

00000

स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे आयोजन

*नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणादि. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी नाविन्यता सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या नोंदणीकरिता शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आणि उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली दि. 2 ऑगस्ट 2023 ते दि. 31 ऑगस्ट 2023 या कालावधीपासून अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहिर करण्यात आले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणातून राज्यात स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याकरिता इनक्यूबेटरची स्थापना आणि विस्तार, गुणवत्ता परीक्षण आणि बौद्धिक संपदा हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रेड चॅलेंज स्टार्टअप वीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यात सहभागी होण्याकरिता msins.inschemes.msins.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. स्टूडंट इनोव्हेशन चॅलेंज हा तरुण उद्योजकांचा शोध घेण्याचा आणि त्यांची स्टार्टअपची स्वप्ने साध्य करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी उपक्रम आहे. कोणत्याही संस्था, तसेच संस्थेतील विद्यार्थी इनोव्हेशन चॅलेंजसाठी पात्र आहेत.

जिल्ह्यातील महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन चलेंजमध्ये सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी प्रत्यक्ष अथवा 07262-242342 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

सारथीतर्फे कौशल्य प्रशिक्षणाची संधी

बुलडाणादि. सारथीतर्फे जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा गटातील उमेदवारांकरिता कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास सोसायटीतर्फे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा गटातील उमेदवारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होण्याकरिता सुरूवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सारथीच्या लक्षित गटातील एकुण 20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील युवक-युवतींना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याच्या उद्देशाने कौशल्य प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्याची गुगल फार्म लिंक kaushalya.mahaswayam.gov.in/user/sarthi अशी आहे.

जिल्ह्यातील सारथी गटातील इच्छुक युवक, युवतींनी सदर प्रशिक्षण घेण्याकरिता लिंकद्वारे नाव नोंदणी करावी, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी प्रत्यक्ष अथवा 07262-242342 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000




अर्थव्यवस्था अभियानातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती

बुलढाणा, 3 : खाण आणि पोलाद मंत्रालय, जेएनएआरडीडीसी, नागपूर आणि नाल्को, एनएमडीसी आणि एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्यावतीने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

विभागप्रमुख डॉ. पी. जी. भुक्ते, जेएनएआरडीडीसीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मोहम्मद नजर यांनी मेटल रिसायकलिंग आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबाबत सादरीकरण केले. कार्यक्रमाला तहसीलदार रुपेश खंडारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, सुकेश झंवर, शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली उबरहंडे उपस्थित होते. लहान मुलांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उपक्रमाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले. या कार्यशाळेत 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वोत्कृष्ट पाच प्रदर्शन आणि रेखाचित्रांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

जेएनएआरडीडीसीच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीमती आर. विशाखा यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सवांतर्गत पर्यावरणासाठी टिकाऊपणा, जीवनशैलीवर आधारित आहे. मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर विदर्भातील 11 जिल्ह्यातील 22 शाळांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुलडाणा येथे दहावा कार्यक्रम पार पडला. यात सहकार विद्या मंदिर, माल विहिर आणि सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

00000


No comments:

Post a Comment