Wednesday 9 August 2023

DIO BULDANA NEWS 09.08.2023

 






जिल्हाधिकारी कार्यालयात पंचप्रण शपथ

*‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिम

*कर्मचाऱ्यांच्या दिवा घेऊन सेल्फी

बुलडाणा, दि. 9 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीमेस बुधवार, दि. 9 ऑगस्टपासून सुरूवात करण्यात आली. मोहीमेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी पंचप्रण शपथ दिली. त्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाती दिवा घेऊन सेल्फी काढल्या.

‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीमेतून आपल्या मातीविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांनी दिवा घेऊन सेल्फी काढल्या.

यावेळी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या पत्नी सुमनबाई पांडुरंग पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश टिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, सुरेश थोरात, तहसीलदार संजिवनी मोपळे, माया माने, प्रिया सुळे, नायब तहसिलदार प्रमोद करे, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते.

‘मेरी माटी, मेरा देश’ मोहीमेत जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक कार्यालय, जिल्हा माहिती  कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, समाज कल्याण विभाग या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली.

या उपक्रमात शालेय प्रांगणामध्ये शिलाफलकाची उभारणी, वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजारोहण व राष्ट्रगीत आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामपंचायत स्तरापासून ते महानगरापर्यंत सर्व स्थानिक स्वराज संस्थांनी तसेच राज्य शासनाचे विभाग विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, सहभागाचे छायाचित्र yuva.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

00000

सहकार विभागाची सोमवार, बुधवारी परीक्षा

बुलडाणा, दि. 9 : सहकार विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार सोमवार, दि. १४ ऑगस्ट आणि बुधवार, दि. १६ ऑगस्ट 2023 रोजी ऑललाईन परिक्षा घेण्यात येणार आहे.

या जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टीसीएस कंपनीतर्फे परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडीवर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

 उमेदवारांनी संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे. परीक्षेस येताना प्रवेशपत्राची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक एस. व्ही. बदनाळे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment