Friday 4 August 2023

DIO BULDANA NEWS 04.08.2023

स्वातंत्र्यदिनी ध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 4 :  भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान होणार नाही, यासाठी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9.05 मिनीटांनी होणार आहे. ध्वजवंदन निमित्त जबाबदारी सोपविलेल्या विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करावे. मुख्य कार्यक्रमाच्या वेळी इतर ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात येऊ नये. शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ध्वजसंहितेनुसार ध्वजवंदन होईल, याची काळजी घ्यावी. तसेच प्रभात फेरी काढण्यात यावी. ध्वजवंदन करीत असताना राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान सहन केल्या जाणार नाही. त्यासाठी राष्ट्रध्वज सुस्थितीतील उपयोगात आणावा.

स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवाचा समारोप निमित्त गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत. हर घर तिरंगा मोहिम यशस्वी होण्यासाठी कार्यालयांनी आपल्या अधिनस्त कार्यालयात याबाबत सूचना द्याव्यात. घरोघरी तिरंगा फडकविताना ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

0000000

स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासाठी जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिम

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 4 : भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक आणि वीरांचा सन्मान करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत वीरांच्या स्मरणार्थ जिल्ह्यात अमृत सरोवराच्या ठिकाणी फलक उभारण्यात येणार असून परिसरात 75 झाडे लावण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली.

‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जिल्ह्यात 87 अमृत सरोवराच्या ठिकाणी शिलाफलक उभारले जाणार आहे. वीरांना आदरांजली वाहण्यासाठी हे शिलाफलक बसविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीमध्ये या फलकाचे अनावरण करण्यात येतील. तसेच पंचप्रण प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. नागरिकांना आपले छायाचित्र merimaatimeradesh.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे. या उपक्रमातून स्वातंत्र्यता संग्राम सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

            मेरी मोटी मेरा देश या मोहिमेत ग्रामीण आणि शहरी भागातून माती गोळा गेली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणाहून आलेली माती एक कलशात भरण्यात येणार आहे. त्यानंतर ही माती विजय पथ येथे निर्माण करण्यात येणाऱ्या अमृत वाटिका तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या समारोपाचा हा कार्यक्रम असणार आहे.              

नागरिकांनी पंच प्रणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घ्यावी. राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल. 'मेरी माटी मेरा देश' ही मोहिम दि. 9 ऑगस्ट रोजी सुरू होऊन दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनापर्यंत विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 16 ऑगस्ट 2023 पासून गट, नगरपालिका, नगरपरिषद आणि राज्यस्तरावर विविध कार्यक्रम होतील. या उपक्रमाचा समारोप दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली होणार आहे.

00000000


No comments:

Post a Comment