Posts

Showing posts from January, 2026

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

               बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणाद्वारे गुरुवार दि.15 जानेवारी रोजी ऑलिंपिक वीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेतले जाणार असून या उपक्रमास सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर यांनी केले आहे.              दिवंगत खाशाबा जाधव ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, हेलसिंकी येथे 1952 मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारातील कुस्तीमध्ये पहिले कास्य पदक पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासीक कामगिरी केली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान असून नवोदित खेळाडुंना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याकरीता राज्यभरात त्यांचा जन्मदिवस 15 जानेवारी क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो.              या दिवसानिमित्त जिल्ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्राथमिक व माध्यमिक श...

नशेची औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू नयेत - सहाय्यक आयुक्त गजानन घिरके केमिस्ट-ड्रगिस्टांना कायदेशीर खबरदारीचे आवाहन

    •           बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : समाजाचे आरोग्य जपण्याची महत्त्वाची जबाबदारी औषध विक्रेत्यांवर असून नवी पिढी नशेकडे वळू नये यासाठी नशेची औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू नयेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन घिरके यांनी केले. एनडीपीएस अॅक्टच्या अनुषंगाने सर्व केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात गजानन घिरके यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट, मेडिकल डिव्हायसेस नियम 2017 तसेच नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक संबंधित कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. औषध विक्री करताना संबंधित कायद्यांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मार्गदर्शनात त्यांनी डॉक्टरांनी ‘शेड्युल-के’चे पालन करावे, घाऊक विक्रेत्यांनी कायद्याच्या चौकटीतच व्यवसाय करावा व डॉक्टरांना थेट मोठ्या प्रमाणात औषध पुरवठा टाळावा, असे स्पष्ट केले. तसेच डॉक्टरांनी आवश्यक औषधांची माग...

ई-पीक पाहणीची नोंदणी 24 जानेवारीपर्यंत करा; जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 9 :   शासनाच्या महत्त्वाकांक्षी रब्बी हंगाम ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्वे-DCS) उपक्रमाची सुरुवात दि. 10 डिसेंबर 2025 पासून झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 वर पीक पेरा स्वतः अँड्रॉईड मोबाईलद्वारे नोंदविणे आवश्यक आहे. शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत दि. 24 जानेवारी 2026 असून सर्व शेतकरी बांधवांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. रब्बी हंगाम 2025 च्या ई-पीक पाहणी (Digital Crop Survey) अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत 89 हजार 340.75 हेक्टर क्षेत्रावर तसेच एकूण 7 लाख 99 हजार 195 पिक पाहणी करावयाच्या ओनर प्लॉटपैकी (owner’s plots) 80 हजार 028 प्लॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी DCS व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅपद्वारे आपल्या 7/12 वर पीक नोंदणी केली आहे. सध्या जिल्ह्यात ई-पीक पाहणीची नोंदणी 39.32 टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रावर सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-पीक पाहणीसाठी DCS व्हर्जन 4.0.5 हे अॅप अँड्रॉईड फोनवर आवश्यक असून गुगल क्रोम अपडेट करून मोबाईलमध...

बुलढाण्यात चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

    * 15 ते 17 जानेवारीदरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम बुलढाणा, (जिमाका) दि. 9 :  महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय व स्वयंसेवी बाल विकास संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार व उन्मार्गी बालकांसाठी चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 15 ते 17 जानेवारी 2026  या कालावधीत शरद कला महाविद्यालय, हाजी मलंग दर्ग्याजवळ, चिखली रोड, बुलढाणा येथे होणार आहे. महोत्सवाच्या माध्यमातून बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यात बंधुभाव, सांघिक भावना व आत्मविश्वास निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. महोत्सवात विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील विविध बाल विकास संस्थांमधील बालके या स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहेत. सदर महोत्सवाला जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांतील व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली आहे. 00000

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला राज्यस्तरीय निवड चाचणी

              बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार छत्तीसगड राज्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या 'पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26' साठी महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत फुटबॉल, हॉकी, आर्चरी, ॲथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग व कुस्ती या खेळांचा समावेश असून ही स्पर्धा खुल्या वयोगटात पार पडणार आहे. सदर स्पर्धेसाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यस्तरीय निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडू व संघांना राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय निवड चाचणी व स्पर्धेमधून निवड झालेले खेळाडू व संघ पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26 करीता पात्र ठरणार आहेत. राज्यस्तरीय निवड चाचणी अंतर्गत दि. 13 जानेवारी 2026 रोजी विविध ठिकाणी निवड चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत. अमरावती येथे आर्चरी, कुस्ती व वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारांच्या निवड चाचण्या जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन गेट, अमरावती येथे होणार असून खेळाडूंन...

भूजल व्यवस्थापन आणि साठा विषयावर कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन

Image
  बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : जल शक्ति मंत्रालय,जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण यांच्या निर्देशानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील भूजल साठ्याची सद्यस्तिथी, त्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि भूजल माहितीचा प्रभावी वापर या विषयावर केंद्रीय भूमिजल बोर्ड, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दि. 7 जानेवारीला कार्यशाळा संपन्न झाली. तसेच भूजल माहितीचे प्रसारण आणि उपयोग व राष्ट्रीय जलभृत मानचित्रण आणि प्रबंधन कार्यक्रम यावर आधारित या कार्यशाळेतून जलसंधारणाचा आराखडा मांडण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेची सुरुवात केंद्रीय भूमिजल बोर्ड, नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस. पुरती यांच्या उदघाट्नपर भाषणाने झाली. त्यानंतर वैज्ञानिक प्रिती डी .राऊत यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठीच्या "राष्ट्रीय जलभृत मानचित्रण आणि प्रबंधन कार्यक्रम" यावर सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील जलभंडाराची वैशिष्ट्ये, उपलब्ध भूजल संसाधने आणि भविष्यातील पाणी व्यवस्थापन धोरणांचा आढावा घेण्यात आला. कार्यशाळे दरम्यान, ‘राष्ट्रीय भूजलस्तर नका...

हरभऱ्यावर घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 08 :   जिल्ह्यातील बहुतांश भागात हरभऱ्याचे पीक फुलोरा अवस्थेत असून या कालावधीत घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. घाटेअळी ही हरभऱ्याची प्रमुख कीड असून तिच्यामुळे फुले व घाट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. घाटेअळीची मादी पतंग पानांवर, कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. अंड्यातून २ ते ३ दिवसांत अळी बाहेर पडून प्रथम पानावरील हरितद्रव्य खरडून खाते. पुढे अळ्या संपूर्ण पाने, देठे तसेच फुले व घाटे खातात. मोठ्या अळ्या घाट्यांना छिद्र पाडून आतील दाणे खाऊन पाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करू शकते. एकात्मिक व्यवस्थापन : 1) घाटे अळीचे परभक्षक बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामधे फिरून घाटे अळया वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत. 2) ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी ...

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  महात्मा बसवेश्वर सामाजिक समता, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक समाज प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच सदर समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता पुरस्कार एक व्यक्ती व एक संस्था यांना देण्यात येतात. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर पुरस्कार हा विरशैव-लिंगायत समाजाकरीता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, समाज संघटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यीक तसेच सामाजिक संस्था यांना सन 2025-26 या वर्षासाठी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पुरूष वयोमर्यादा किमान 50 वर्ष तर महिला किमान 40 वर्ष असून सामाजिक संस्थेसाठी सदर क्षेत्रातील किमान 10 वर्ष कार्य केलेले असल्याचा निकष आहे. इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांनी 15 दिवसाच्या आत आपला प्रस्ताव सहाय्यक संचा...

सिकलसेल मुक्तीसाठी 15 जानेवारीपासून विशेष अभियान; 7 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभरात तपासणी व जनजागृती

  बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : जिल्ह्यात सिकलसेल अ‍ॅनिमिया या आनुवंशिक आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 40 वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांची प्राथमिक सिकलसेल तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान संशयित रुग्ण व वाहकांची नोंद घेऊन आवश्यकतेनुसार एचपीएलसी (HPLC) किंवा इलेक्ट्रोफोरेसिस या प्रगत तपासण्या केल्या जाणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा या विशेष अभियानासाठी सज्ज झाली आहे. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये आवश्यक मनुष्यबळ व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी राहील प्रक्रिया: अभियानादरम्यान 40 वर्षांपर्यंतच्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. संशयित रुग्णां...

अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनांतील लाभार्थ्यांना 15 जानेवारीपर्यंत विशेष मुदत

  बुलढाणा, (जिमाका) दि. 8 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांतर्गत ज्या लाभार्थ्यांचे पात्रता प्रमाणपत्र (LOI) दि. 1 जानेवारी 2025 पूर्वी निर्माण झाले आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना बँकेकडून कर्ज मंजुरी प्राप्त झाली आहे, अशा सर्व प्रकरणांसाठी दि. 15 जानेवारी 2026 पर्यंत पोर्टलवर बँक मंजुरीपत्र अपलोड करण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे. या विशेष सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रश्नावलीस योग्य उत्तरे देणे आवश्यक आहे. प्रश्नावली पूर्ण केल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना बँक मंजुरीपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सदर सुविधा तात्पुरत्या स्वरूपाची असून, लाभार्थ्यांनी दि. 15 जानेवारी 2026 पूर्वीच बँक मंजुरीपत्र पोर्टलवर अपलोड करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. 00000

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत जिल्ह्यात तिळाचे 100 टक्के अनुदानावर बियाणे वितरण

      •            शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन   •             पहिल्या अर्जदारास प्राधान्य                    बुलढाणा, (जिमाका) दि. 07 :   राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया गळीतधान्य कार्यक्रम अंतर्गत उन्हाळी हंगाम 2025-26 करिता तिळाचे प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनामार्फत बुलढाणा जिल्ह्यासाठी हे बियाणे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांना तिळाचे उत्पादन वाढविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. देशातील खाद्यतेल आयात कमी करणे, स्वावलंबन साध्य करणे तसेच तेलबिया उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व सुधारित वाणांचा प्रसार करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. यानुसार तिळासाठी हेक्टरी 2.5 किलो (रु. 197 प...

बुलढाण्यात शुक्रवारी अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन शिबिर

  बुलढाणा, (जिमाका) दि. 07 :   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या ड्रग अव्हेरनेस अँड वेलनेस नेव्हीगेशन फार ड्रग फ्रि इंडीया (Drug Awareness and Wellness Navigation for Drug Free India) योजना 2025 अंतर्गत दि. 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालय, बुलढाणा येथे अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोने अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध तयार केलेल्या “ Say Yes to Life, No to Drugs ” या घोषवाक्याच्या अनुषंगाने यावेळी शपथवाचन करण्यात येणार आहे. त्यानंतर अंमली पदार्थ व मनोव्यापारक पदार्थ अधिनियम, 1985(NDPS Act), औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945, अंमली पदार्थांचे सेवन, त्याचे दुष्परिणाम तसेच कायद्यातील तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश नितीन पाटील राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे), गजानन घिरके, केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनाचे अध्यक्ष गजानन शिंदे तसेच राजर्षी शाहू औषध निर्म...

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन Ø पत्रकार दिन साजरा

Image
    बुलढाणा, (जिमाका) दि. 06: मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.   याप्रसंगी माहिती सहायक सतिष बघमारे, पत्रकार गणेश उबरहंडे, डिगांबर कंकाळ, संजय गवई, वरिष्ठ लिपीक श्रेया दाभाडकर, प्रेमनाथ जाधव, प्रतिक फुलाडी, जयंत वानखेडे, शिपाई राम पाटील, वाहनचालक नामदेव घट्टे यांनी फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. ०००

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 28 जानेवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

    बुलढाणा, (जिमाका) दि. 06: भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता व क्षेत्र अधिकारी यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह दि. 28 जानेवारी 2026 रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.              थेट अभिकर्तासाठी अर्जाचा नमुना बुलडाणा प्रधान डाक घर किंवा डाक अधीक्षक बुलडाणा यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. एजंट भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी. बेरोजगारीत किंवा स्वयंम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवानिवृत्त शिक्षक व इतर अर्ज करू शकतील. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबत ज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे.          ...

एकलव्य इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज करावा; एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आवाहन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 06 : आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेशासाठी परीक्षा दि. 1 मार्च 2026 रोजी होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज   दि. 30 जानेवारी 2026 पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी, 6 वी, 7 वी, व 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील. या सर्व शाळांतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयाकडे सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित आदिवासी शासकीय/अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास...

मेहकर तालुक्यात 19 हजार 616 घरकुलांना मंजुरी; 5 हजार 827 घरकुल पूर्ण तर 13 हजार 700 प्रगतीत

  बुलढाणा, (जिमाका) दि. 05 :   जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये विविध आवास योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत विविध आवास योजनेंतर्गत19 हजार 616 घरकुले मंजूर असून त्यापैकी 5 हजार 827 घरकुले पुर्ण झालेले आहेत. उर्वरित 13 हजार 700 घरकुल प्रगतीत आहे.   प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत टप्पा–1 मध्ये 2 हजार 784 व टप्पा-2 मध्ये 11 हजार 277 अशी एकूण 14 हजार 061 घरकुले मंजूर असून त्यापैकी 2 हजार 945 घरकुले पुर्ण झाले असून 11 हजार   116 घरकुले सध्या प्रगतीपथावर आहेत. रमाई आवास योजनेअंतर्गत 2 हजार 487 घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 1 हजार 597   घरकुले पूर्ण झाली आहेत व 890 घरकुले प्रगतीत आहेत. शबरी आवास योजनेअंतर्गत 1 हजार 012 घरकुलांचे उद्दिष्ट असून 395 घरकुले पूर्ण झाली आहेत. 598 घरकुले बांधकामाच्या विविध टप्प्यात आहेत. पारधी आवास योजनेमध्ये 32 उद्दिष्टांपैकी 31 घरकुले पूर्ण झाली असून 1 घरकुल प्रगतीत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 61 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. अशा प्रकारे मेहकर तालुक्यात व...

नाशिक छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती; मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : युपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या Combined Defence Services (CDS) Examination-2026 च्या तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे तज्ज्ञ प्राध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक तज्ज्ञ प्राध्यापकांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. तज्ज्ञ प्राध्यपकांची नियुक्ती 300 रुपये प्रती तासिका या मानधनावर करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी सीडीएस-66 कोर्ससाठी दि. 19 जानेवारी ते 3 एप्रिल 2026 तर सीडीएस-67 कोर्ससाठी दि. 15 जून ते 28 ऑगस्ट 2026 राहिल.   इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान-I (सामान्य ज्ञान, भूगोल, इतिहास, भारतीय राजकारण) तसेच सामान्य विज्ञान-II (अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या विषयांमध्ये तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.   प्राध्यापक पदसाठी शैक्षणिक अर्हता संबंधित विषयातील पदवीधर अथवा पदव्युत्तर तज्ञ प्राध्यापक असणे आवश्यक असून, स्पर्धा परीक्षांच्या अध्यापनाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे बंधन...

सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक पदांसाठी मुदतवाढ ऑनलाईन अर्जासाठी पर्यायी वेबलिंक व QR कोड उपलब्ध

  बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक (गट-क) पदांच्या भरतीसाठी दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार तसेच दि. 07 डिसेंबर 2025 च्या शुद्धीपत्रकानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणामुळे दि. 26 डिसेंबर 2025 पासून निष्क्रीय झाल्याने इच्छुक उमेदवारांना अर्जासाठी आवश्यक असलेल्या वेबलिंकपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. ही अडचण लक्षात घेता उमेदवारांच्या सोयीसाठी अर्ज सादर करण्यासाठी पर्यायी वेबलिंक व QR कोड (https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html) उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार, उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबलिंक किंवा QR कोडचा वापर करून आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात येऊन दि. 9 जानेवारी 2026 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती सैनिक कल्...

बुलढाणा तालुक्यातील अवसायनातील सहकारी संस्थांबाबत जाहीर सूचना; 36 संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

  बुलढाणा, (जिमाका) दि. ०५ : बुलढाणा तालुक्यातील विविध सहकारी संस्था दीर्घकाळापासून अवसायनात असून, त्यांच्या नोंदणी रद्द करण्याची वैधानिक प्रक्रिया सहकार विभागाकडून सुरू आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये सदर कार्यवाही करण्यात येत असून, संबंधित संस्थांचे व्यवहार अधिकृतपणे बंद करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पायरी आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ८९ (४) नुसार, अवसायनात असलेल्या सहकारी संस्थांविरुद्ध ज्या कोण्या व्यक्ती, संस्थांचे विरुद्ध काही दावे असतील, त्यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत आपले दावे लेखी स्वरूपात, पुराव्यासह संबंधित नोंदणी कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, ठराविक कालावधीत कोणताही दावा किंवा लेखी खुलासा प्राप्त न झाल्यास, त्यानंतर सादर होणाऱ्या दाव्यांची दखल घेतली जाणार नाही. तसेच अशा उशिरा दाखल होणाऱ्या दाव्यांची जबाबदारी सहकार विभाग अथवा संबंधित अवसायकावर राहणार नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ नु...

कृषी विज्ञान केंद्रात विकसित भारत रोजगार हमी मिशनबाबत चर्चासत्र संपन्न

Image
बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : येथील कृषी विज्ञान केंद्रात आज ‘विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन(ग्रामीण)’ अंतर्गत ग्रामस्तर लोकप्रतिनिधींसोबत चर्चासत्र व सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शकाव्दारे शासनाच्या योजना, नवीन तंत्रज्ञान, शेतीविषयक अडचणीवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे उपस्थित होते. तसेच सरपंच, हातेडी (खु.) प्रशांत गाडे, सरपंच चौथा गजानन गायकवाडसह पंचक्रोशीतून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपातळीवरील समितीचे सदस्य तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य उपस्थित होते. मार्गदर्शन करताना शिवशंकर भारसाकळे यांनी विकसित भारत कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नवीन स्वरूप असलेल्या विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होई...

१४ व १९ वर्षांखालील मुलींच्या हॉकी संघाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

Image
  बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा तसेच सहकार विद्या मंदिर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १९ वर्षांखालील मुलींसाठी हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दि. २७ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या आधुनिक एस्ट्रो टर्फ मैदानावर उत्साहात पार पडले. या प्रशिक्षण शिबिरात निवड झालेल्या दोन्ही वयोगटातील संघ दि. १ जानेवारी २०२६ रोजी मध्यप्रदेश येथील ग्वालियर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले. ज्योती चव्हाण व वैशाली सूड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव देण्यात आला. संघ रवाना होण्यापूर्वी आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात सहकार विद्या मंदिरच्या चेअरमन कोमल झंवर, प्राचार्य अलगर स्वामी, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, लक्ष्मी शंकर यादव, मुख्याध्यापिका श्रीमती ससे, हॉकी प्रशिक्षक सय्यद आबीद तसेच संघ व्यवस्थापक डॉ. जीवन मोहोळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षण शिबिरामुळे जिल्ह्यातील महिला हॉकी खेळाडूंना दर्जेदार ...

तक्रारी निकाली काढून नागरिकांना न्याय द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Image
  * जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 8 तक्रारी दाखल      बुलढाणा, (जिमाका) दि. 05 : नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी लोकशाही दिन एक सशक्त माध्यम असून जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये   नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात. या तक्रारींवर विहीत कालावधीत कार्यवाही होवून तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रारी निकाली काढून नागरीकांना न्याय द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.                 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन 5 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे विभागप्रमुख, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.      जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये एकूण 8 तक्रारी प्राप्त झाल्या असून सामान्य तक्रारींमध्ये समाविष्ट करण्यात आल्यात. या लोकशाही दिन कार्यवाहीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते...

जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारावे - जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन

Image
  Ø   बुलढाण्यात महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा उत्साहात बुलढाणा,(जिमाका) दि.02: जिल्ह्यात फळपीक, अन्न व कृषी आधारित उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असून शेतकरी, युवक-युवती, महिला बचत गट, नवउद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या संधीचा लाभ घेत प्रक्रिया उद्योग उभारुन निर्यात वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. जिल्हा निर्यात प्रचालन समिती आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित महा निर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६ अंतर्गत विशेष कार्यशाळा शुक्रवारी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील पुढे म्हणाले की, राज्य शासनाने १ ट्रिलियन डॅालरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवून उद्योग व निर्यात वाढीसाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यात फळपीक प्रकिया, बिजोत्पादन, भाजीपाला, औषध निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याची मोठी संधी आहे. त्यास...