राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
बुलढाणा, (जिमाका) दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणाद्वारे गुरुवार दि.15 जानेवारी रोजी ऑलिंपिक वीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेतले जाणार असून या उपक्रमास सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर यांनी केले आहे. दिवंगत खाशाबा जाधव ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, हेलसिंकी येथे 1952 मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारातील कुस्तीमध्ये पहिले कास्य पदक पटकावून देशाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासीक कामगिरी केली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी राज्याचा बहुमान असून नवोदित खेळाडुंना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याकरीता राज्यभरात त्यांचा जन्मदिवस 15 जानेवारी क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिवसानिमित्त जिल्ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्राथमिक व माध्यमिक श...