देव्हारी शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय कागदपत्रे आता जिल्हा परिषद शाळा वरवंड येथे मिळणार
वृत्त क्रमांक : 911 दिनांक
: 12.12.2024
देव्हारी शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय कागदपत्रे
आता जिल्हा परिषद शाळा वरवंड येथे मिळणार
बुलढाणा, दि.12 (जिमाका)
: पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा देव्हारी
ही शाळा विस्थापित झाल्यामुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांशी
संबंधित सर्व दस्तऐवज, शाळा दुय्यम प्रत व इतर सर्व अभिलेखे हे नजिकची शाळा जि.प. मराठी
उच्च मराठी शाळा वरवंड येथे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी व पालकानी शाळेशी
संबंधित कामासाठी मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी उच्च शाळा वरवंड यांच्याशी संपर्क
साधावा, असे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी केले आहे. 00000000
Comments
Post a Comment