9 डिसेंबर रोजी डाक अदालत
9 डिसेंबर रोजी डाक अदालत
बुलडाणा, दि. 3 (जिमाका): देशातील पोस्टाची सेवा
ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये
अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित
केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे
जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देतांना संभाषण, पत्रव्यवहार
किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, ज्यामुळे
पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे
न्याय निवाडा करण्यासाठी अधीक्षक डाक घर, बुलडाणा विभाग, बुलडाणा 443001 व्दारा सोमवार,
दि. 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक बुलडाणा डाक विभाग यांच्या
कार्यालयामध्ये डाक अदालत आयोजित करण्यात येत आहे.
पोस्टाच्या
कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दलच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत
झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल
घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या
तक्रारी विचार घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा.
तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रारी पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. संबंधित
डाक सेवेबाबतची आपली तक्रार बुलडाणा डाक विभागाचे अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या
नावे दोन प्रतीसह शुक्रवार, दि. 6 डिसेंबर 2024 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा
रीतीने पाठवावी. त्यानंतर आपल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, असे बुलडाणा
डाकघर विभागाचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment