अनुकंपाधारक उमेदवारांची सुधारीत जेष्ठता यादी जाहिर; मुळ कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन


 

वृत्त क्रमांक : 921                                                     दिनांक : 16.12.2024

 

बुलढाणा, दि. 16(जिमाका) : जिल्हा परिषद अंतर्गत सन 2024 ची अनुकंपाधारक उमेदवारांची सुधारीत अंतीम जेष्ठता यादी जिल्हा परिषदच्या  www.zpbuldana.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

        अनुकंपा पदभरतीची कार्यवाही करण्यापुर्वी सन 2024 च्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या अंतीम जेष्ठता यादीतील अ.क्र. 1 ते 244 पर्यंत उमेदवारांची मुळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांची शैक्षणिक अर्हतेची माहिती अद्यावत करण्यासाठी अंतिम जेष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांनी दि. 18 व 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे मुळ कागदपत्र तपासणी करण्याकरीता उपस्थित राहावे. याची सर्व अनुकंपाधरक

उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) यांनी केले आहे.

0000000

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या