शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
बुलढाणा, दि.
19(जिमाका) : चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्कुल कनेक्ट वीक, तंत्रप्रदर्शनी, व अल्पसंख्यांक
हक्क दिवस साजरा करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला.
9 ते 13 डिसेंबर दरम्यान ‘स्कुल कनेक्ट वीक’ साजरा
बुलढाणा जिल्ह्यातील
चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि.9 ते 13 डिसेंबर 2024 दरम्यान स्कुल
कनेक्ट वीक म्हणून साजरा करण्यात आला. या सप्ता मध्ये चिखली तालुक्यामधील तब्बल 83
विविध शाळाना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध व्यवसाय अभ्यासक्रम, त्यांची उपयुक्ता, रोजगार
स्वयंरोजगारची संधी याबाबतची माहिती देण्यात आली. भविष्यात तांत्रिक व्यवसाय मध्ये
शिक्षण घेतल्यानंतर तांत्रिक माहितीचा उपयोग कसा होतो याबाबतचे महत्व पटवून देण्यात
आले.
तंत्रप्रदर्शनीला प्रशिक्षणार्थ्यांचा उर्त्स्फुत
प्रतिसाद
शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था चिखली येथे दि.18 डिसेंबर रोजी तंत्रप्रदर्शनी आयोजित करण्यात आले.
या तंत्रप्रदर्शनी मध्ये विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग
घेतला. या तंत्रप्रदर्शनीव्दारे त्यांच्यातील सुप्त गुणाला वाव मिळावा म्हणून विविध
शाळेमधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करुन त्यांना प्रदर्शनीमध्ये तयार करण्यात आलेले
विविध प्रकल्प दाखवून त्याबाबतची माहिती देण्यात आली. सदर प्रदर्शनीमध्ये संस्थेतील
प्रशिक्षणार्थीनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन आपल्या मधील सुप्त गुणांचे प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार
पाडण्यासाठी संस्थेतील प्राचार्य शिल्प निदेशक व कर्मचारी वृंद यांनी योग्य मार्गदर्शन
करुन सहकार्य केले.
अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्सहात साजरा
शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था चिखली येथे दि.18 डिसेंबर 2024 रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्सहात
साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेतील अध्यक्ष व प्राचार्य पी. एन. देशमुख आणि शिक्षक
व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच शिल्प निदेशक एम. व्ही. सोनूने यांनी अल्प संख्याकाचे
घटनात्मक अधिकार आणि कायदेशीर हक्का बाबतचे महत्व प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन
केले.
000000000
Comments
Post a Comment