ई-पीक पाहणी नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

ई-पीक पाहणी नोंदणीसाठी  15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 बुलढाणा, दि. 24(जिमाका) : सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची (ई-पीक पाहणी) सुरुवात दि 1 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे. आपल्या सातबारावर पीक पेरा स्वता: शेतकऱ्यांनी ॲन्ड्राईड फोन द्वारे नोंदणी करायची आहे. शेतकरीस्तरावर पीक पाहणी करण्यासाठी अंतिम दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत आहे.

रब्बी हंगामी 2024 ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आज रोजी पर्यंत 756535 हे. आर. क्षेत्रापैकी 109096 हे. आहे क्षेत्रावर, तसेच एकूण 836033 पीक पाहणी करावयाच्या owner’s प्लॉटपैकी 105642 प्लॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ईपीक पाहणी डीसीएस व्हर्जन 3.0 या मोबाईल ॲपद्वारे आपल्या सातबारावर नोंदणी केलेली आहे. आजवर बुलढाणा जिल्ह्यात डिजटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई-पीक पाहणीची नोंदणी 14.42 टक्के  क्षेत्रावर झोलेली आहे. उर्वरित क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधावांना ई पी कपाहणी ॲपद्वारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सदर पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी व्हर्जन 3.0 या मोबाईल ॲपद्वारे करतांना ॲन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. सदर ॲप गूगल फोन अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई पीक पाहणी ॲप द्वारे शेत बांधावर जावुन पीकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. या कामी संबंधित शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास, संबंधित गावाचे तलाठी, कोतवाल तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची मदत घेवून आपल्या पीकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपद्वारे करून घेण्यात यावी. सदर ॲपविषयी काही अडचण असल्यास संबंधित गावाचे तलाठी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या गावातील डीसीएस करिता नियुक्त सहाय्यक यांची मतद घ्यावी.

ई पीक पाहणी द्वारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या सातबारा  वर पीक पेरा कोरा राहील. जो नंतर भरता येत नाही त्यामूळे पीक विमा, व इतर शासकीय अनुदान व लाभर मिळविण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गीक आपत्ती या बाबत पिक विमा मिळण्यासाठी सातबारा वर अचूक पीक नोंद असणे आवयक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी 15 जानेवारी 2025 पुर्वी आपल्या पीकांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी सदाशिव शेलारेयांच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या