जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम सुरु ३ लाख लोकांचे होणार सर्वेक्षण ; १५१ पथकांची निर्मिती
जिल्ह्यात सक्रीय
क्षयरुग्ण शोध मोहीम सुरु
३ लाख लोकांचे
होणार सर्वेक्षण ; १५१ पथकांची निर्मिती
बुलढाणा,
दि. 24(जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यकम
अतर्गत जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. क्षयरोग निदानापासून
वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीव्दारे शोधून काढण्यासाठी केंद्र शासनातर्फे ही
मोहीम राज्यामध्ये राबविण्याचे ठरविलेले आहे. या मोहिमेंतर्गत ३०१५३३ लोकसंख्यांचे
सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्ये १५१ पथकांची निर्मीती
करण्यांत आलेली आहे.
ही
दि. २३ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यामध्ये राबवण्याची तयारी
करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यकम अंतर्गत जिल्ह्यात केंद्र शासनाच्या
मार्गदर्शक तत्वावर सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सन 2003 पासून राष्ट्रीय क्षयरोग
दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमातर्गत क्षयरोगाची लक्षणे
असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान शासकीय आरोग्य संस्थेत करण्यात येते. बरेचसे
क्षयरुग्ण खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेत असतात. केंद्र सरकारतर्फे या
क्षय रुग्णांचे नोटिफिकेशन शासनाकडे करण्यसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. यामुळे
काही प्रमाणात क्षयरुग्ण नोंदणी
मध्ये
अल्पशी वाढ झालेली आहे. फुपुसाचा क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण होणाऱ्या त्रासाकडे
दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे.
या
कार्यक्रमातंर्गत क्षयरुग्ण नोंदणी होण्याचे प्रमाण वाढणे तसेच समाजामध्ये
क्षयरोगाबद्दल जनजागृती होऊन क्षयरोगाचे निदान लवकर होण्यास मदत होईल.
सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण ३०१५३२८ लोकसंख्यापैकी १० टक्के म्हणजे ३०१५३३
लोकसंख्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हयामध्ये १५१ पथकांची
निर्मीती करण्यांत आलेली आहे. तसेच ३० सुपयरवायझर, व आशावर्कर एकुण टिममेंबर ३०२
अशा कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या
मोहिमेचे उद्दिष्ट क्षयरोगाचे निदान होण्यापासून अद्यापही वंचित असणाऱ्या सर्व
क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे आहे. यानुसार या मोहिमेमध्ये
जोखमीच्या क्षेत्र / ठिकाणी गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना
शोधणे. त्यांची थुंकी नमुने तपासणी, एक्स रे व आवश्यकते प्रमाणे इतर तपासण्या करुन
क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे अपेक्षित आहे.
यासाठी
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कर्मचारी त्यांचे भागधारक अशासकीय संस्था
तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग यांची पथके निवडलेल्या भागात घरोघरी
संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. मोहिमेदरम्यान सर्व गरजू व्यक्तींनी
संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या भागामध्ये गृहभेटी व्दारे
घरातील व्यक्तींशी संवाद साधणे, पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्फलेटस या व्दारे व्यापक
प्रसिध्दी करण्यात येत आहे.
या
विशेष मोहिमेतंर्गत बुलडाणा जिल्हयातील वंचित घटक उदा. झोपडपट्टी, पोहचण्यासाठी
अवघड गावे आणि वस्त्या, कारागृहातील कैदी, ज्या गावात रुग्ण जास्त असू शकतात असे
गावे, एच आय व्ही अतिजोखीम गट, असंघटित कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम
करणारे कामगार, बेघर, वृध्दाश्रम अशा निवडलेल्या भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य
सेवेतील कर्मचारी , आशावर्कर,आंगणकवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी
आणि इतर स्वयंसेवक हे भेटणारे
संशति क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. गृहभेटी दरम्यान पथक सदस्य निश्चित
केलेल्या सर्व घरांना भेटी देऊन घरात असलेल्या सर्व व्यक्तींची क्षयरोग लक्षणांनी
माहिती घेणार असून क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीची थुंकी नमुना गोळा करुन तपासणी करिता
जवळच्या प्रयोगशाळेला पाठविणार आहे.
क्षयरोगाची
खालीलप्रमाणे लक्षणे असतात.
दोन आठवडे
किंवा त्यापेक्षा जास्त गालावधीचा खोकला असणे.तसेच दोन आठवडयापेक्षा जास्त मुदतीचा
ताप असणे. मागील तीन महिन्यामध्ये वजमात लक्षणीय घट असणे. थुंकीवाटे रक्त पडणे,
छातीत दुखणे व मानेवरील गाठ, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असणे.
यापैकी कोणतेही लक्षणे असल्यास सदर व्यक्तीने
तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हयातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत
थुंकीनमुना तपासणी, क्ष-किरण तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार
सीबीनॅट मशीनव्दारे तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. निदान आलेल्या सर्व क्षयरुग्णांना
मोफत उपचार सर्व शासकिय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोगा विरोधातल्या या
लढयामध्ये सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. या विशेष मोहिमेव्दारे अद्याप
निदान न झालेल्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांचेवर उपचार करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच शहरी भागासाठी जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदशनाखाली सदर मोहिम राबविण्यांत येत
आहे. या करीता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.
वर्षा श्रीधर गुट्टे यांनी केले.
0000000
Comments
Post a Comment