व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी आज निवड चाचणी
व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी आज निवड
चाचणी
बुलढाणा, दि. 24(जिमाका) : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या द्वारा दि. 7 ते 13
जानेवारी 2025 या कालावधीत
जयपूर राजस्थान या ठिकाणी सन 2025 मधील वरीष्ठ गटाच्या राष्ट्रीय अंजिक्यपद
स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या
निवड चाचणी कार्यक्रमाकरीता वरिष्ठ गटाच्या व्हॉलीबॉल या खेळाच्या इच्छुक खेळाडुंनी
(पुरुष /महिला) दि. 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा
संकुल,जांभरून रोड, बुलढाणा येथे उपस्थित रहावे.
राष्ट्रीय
स्तरावर व्हॉलीबॉल या खेळप्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नसल्याने,
भारतातील व्हॉलीबॉल खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम सुरळीत सुरु रहावे यासाठी
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा ॲडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रस्तावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड दि. 26 डिसेंबर
2024 रोजी सकाळी 8.00 वाजता चंद्रशेखर आगाशे शारीरकि शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी
पुणे 411037 येथे करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हयाचा संघ निवडकरण्याकरीता
खालील प्रमाणे निवड चाचणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी, राज्य संघाची निवड चाचणी
दरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडुंनी स्वत:करायची आहे. खेळाचा गणवेष, आधार
कार्ड, पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उपस्थित खेळाडुमधुन उत्कृष्ठ
पुरुष व महिला प्रत्येकी एक एक संघ पुणे येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्पर्धा
निवडचाचणी कार्यक्रमा करीता पाठविण्यात येईल.
निवड चाचणी कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधकिारी
कार्यालय बुलढाणा व बुलढाणा जिल्हा व्हॉलीबॉल खेळ संघटना यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहीती करीता क्रीडा अधिकारी आर. आर.
धारपवार यांना 9970118797 या क्रमांकावर संपर्क साधावा. उक्त निवड चाचणी करिता
उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर बुलढाणा यांनी केले आहे.
00000000
Comments
Post a Comment