राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

 

वृत्त क्रमांक : 924                                                     दिनांक : 17.12.2024

 



बुलढाणा, दि. 17(जिमाका) :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दि.15 जुलै पासुन दर सोमवार व शुक्रवारला सकाळी 10 ते 2 या वेळेत प्रवासी राजा दिन व दुपारी 3 ते 5 या वेळेत कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

बुलडाणा विभागातील आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. खामगाव आगार येथे शुक्रवार दि. 20 डिसेंबर, मेहकर येथे सोमवार, दि. 23 डिसेंबर, मलकापूर येथे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर, जळगांव जामोद येथे सोमवार, दि. 30 डिसेंबर, शेगांव येथे शुक्रवार, दि. 3 डिसेंबर रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी