राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेमध्ये 2 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन
शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेमध्ये
2 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बुलडाणा,(जिमाका),दि
जिल्ह्यात नाताळ व नववर्ष आगमनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा
कार्यालयाच्या वतीने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी
बुलढाणा कार्यालयाच्या वतीने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी
बुलढाणा जिल्हयातील कार्यक्षेत्रीय अधिकारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा,
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, देऊळगाव राजा व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, खामगाव
व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांच्याकडून बुलढाणा जिल्हयातील विविध हातभटटी
ठिकाण, तसेच अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकुन कारवाई केलेली आहे.
मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई
विजय सूर्यवंशी (भा.प्र.से.) साहेब. संचालक श्री. प्रसाद सुर्वे साहेब व विभागीय उप-आयुक्त
अर्जुन ओहोळे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे गुन्हाअन्वेषणाचे कामकाज सुरू
आहे. तसेच डॉ.पराग नवलकर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हयात दि. 21 डिसेंबर 2024 व 22 डिसेंबर 2024 रोजी मोहिम राबविण्यात आली आहे. सदर
मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यातील अवैध दारु निर्मीती, हातभटटी ठिकाण, तसेच अवैध मद्यविक्री
केंद्रावर एकुण 14 ठिकाणी छापे घालुन 14 गुन्हे नोंदविले असुन 14 आरोपींना अटक केली
असुन सदर गुन्हयात एकुण 1 वाहन जप्त केले असुन सदर गुन्हयात एकुण रुपये 2,96,015
/- एवढा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सदर कारवाई किशोर पाटील, निरीक्षक, बुलढाणा यांच्या अधिनस्त
असलेले ए.जी.शिंदे दुय्यम निरीक्षक, बुलढाणा -1, आर.के. विठोरे दुय्यम निरीक्षक, बुलढाणा-2
व सतिश पाटील दुय्यम निरीक्षक, बुलढाणा-3 तसेच विकास पाटील निरीक्षक, खामगाव यांच्या
अधिनस्त असलेले आर.एन. गावंडे दुय्यम निरीक्षक खामगाव -1 व 3. कुटेमाट दुय्यम निरीक्षक
खामगाव-2 तसेच राहुल रोकडे निरीक्षक. देऊळगाव राजा यांच्या अधनस्त असलेले रोटे, दुय्यम
निरीक्षक देऊळगाव राजा-1 नयना देखमुख, दुय्यम निरीक्षक देऊळगाव राजा-2 व 3 तसेच महेश
बोज्जावारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक बुलढाणा यांच्या अधिनस्त असलेले
माकोडे दुय्यम निरीक्षक, भ.प. यांच्या सहभागाने व मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचया सहभागा आहे.
अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स,
धाब्यांबाबत अवैध मद्य निर्मीती, वाहतुकीबाबत माहिती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क
विभागाकडून टोल फ्री नंबर 18002339999 वर किंवा व्हॉटसॲप नंबर 8422001133 वर किंवा
excisesuvidha.mahaonline.gov.
00000000
Comments
Post a Comment