डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अकोला येथे कृषी प्रदर्शनी; ★२७ ते २९ डिसेंबर दरम्यान प्रदर्शनी ★शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन


 

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अकोला येथे कृषी प्रदर्शनी;

 

★२७ ते २९ डिसेंबर  दरम्यान प्रदर्शनी

★शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

बुलढाणा, दि. 20 (जिमाका) : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग , महाराष्ट्र शासन व आत्मा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने “अॅग्रोटेक-२०२४” या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे आयोजन तीन दिवसीय,दि. २७ ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान क्रीडांगण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला येथे करण्यात आले आहे. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने कृषी तंत्रज्ञानाचा जागर होत असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या “अॅग्रोटेक-२०२४”राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

 

 

या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये : कृषी विद्यापीठ व संलग्न कृषी संस्थांची दालने,             विद्यापीठ शास्त्रज्ञांसोबत विविध विषयांवर दररोज चर्चासत्र, कृषी अवजारे व उत्पादनांची दालने, कृषी व कृषी संलग्नित योजनांची माहिती, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची दालने, मत्स्यव्यवसाय विभागाची दालने, कृषी व ग्रामीण उद्योग दालने, फुले,फळे व भाजीपाला प्रदर्शन, बचत गटांचा सहभा,        विद्यापीठ प्रकाशनाचे दालन राहणार आहे.

 00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या