अंचरवाडीत आढळलेले हवामान यंत्र हे प्रादेशिक हवामान केंद्राचे !
अंचरवाडीत आढळलेले हवामान यंत्र हे प्रादेशिक हवामान केंद्राचे !
बुलढाणा, दि. 3 (जिमाका) : चिखली तालुक्यातील अंचरवाडी
येथे शेतात आढळलेले कोरीयन भाषेतील हवामान यंत्र हे प्रादेशिक हवामान केंद्र,
नागपूर यांचे असून हवामानाच्या अभ्यासाकरीता नियमितपणे परीक्षणासाठी सोडण्यात आले
होते. सदर यंत्रामुळे कोणत्याही प्रकारची वित्त व जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा
प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सोमवार, दि. 2
डिसेंबर रोजी अंचरवाडी ता. चिखली येथील व्दारकाबाई सिताराम परीहार व संजय सिताराम
परीहार यांच्या शेतामध्ये कोरियन भाषेमध्ये लिहीलेला फुगा व दोरा अशा प्रकारचे
हवामान यंत्र आढळून आले होते. या घटनेचा पंचनामा तहसीलदार चिखली यांनी केला असून हे
यंत्र प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांचे असल्याचे निदर्शनास आले. या
यंत्रामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, असा अहवाल तहसीलदार चिखली यांनी दिला
आहे. तसेच सदर हवामान यंत्र ताब्यात घेण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत
सहायक संचालक, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांना कळविण्यात आले आहे.
हवामान तपासण्याकरीता
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्याकडून हवामान यंत्र नियमितपणे अवकाशात सोडले
जातात. सदर हवामान यंत्र हे कोरियन निर्मितीचे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही
प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारचे हवामान यंत्र आढळून आल्यास स्थानिक
प्रशासन व जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment