चिखलीतील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

वृत्त क्रमांक : 910                                             दिनांक : 12.12.2024

 

 

चिखलीतील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, दि.12 (जिमाका) : कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात यंदाच्या रब्बी हंगामापासून ई-पिक पाहणी (डिजीटल क्रॉप सर्वे) या मोबाईल ॲपव्दारे शेतकरी स्तरावरुन पिकाची नोंदणी दि. 1 डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी ई-पिक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जाऊन आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन तहसिलदारांनी केले आहे.

 

डिजीटल क्रॉप सर्वे हा गटाच्या हद्दीवर आधारित बंधनकारक करण्यात आली आहे. जोपर्यंत संबंधित खातेदार निवडलेल्या गटात जाऊन पिक पाहणी करत नाही,तोपर्यंत पिकाचे छायाचित्र काढता येत नाही व पिक पाहणी अपलोड करता येत नाही.

चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी ई-पिक पाहणी डीजीटल क्रॉप सर्वे (DCS) ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जाऊन आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन चिखलीचे तहसिलदार मुरलीधर गायकवाड यांनी केले आहे. 000000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या