शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांच्या माहितीचे संकलन सुरु

 

वृत्त क्रमांक : 907                                            दिनांक : 10.12.2024

 

शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांच्या माहितीचे संकलन सुरु

बुलढाणा, दि. 10 (जिमाका) : शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांसाठी धोरण निश्चिती व त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील संस्था व कंपन्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु झाले आहे.

ही माहिती राज्यस्तरावरील कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील सर्व स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांनी त्यांची अचुक माहिती जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील बीटीएम किंवा एटीएम यांच्याकडे दि.१५ डिसेंबर २०२४ पूर्वी उपलब्ध करून देण्यात यावी, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 00000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या