सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने फोटोग्राफीचे प्रशिक्षण संपन्न
वृत्त क्रमांक : 905 दिनांक
: 10.12.2024
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने
फोटोग्राफीचे प्रशिक्षण संपन्न
बुलढाणा, दि.
10 (जिमाका) : सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या
मार्फत मोफत 30 दिवसीय फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षण संपन्न झाले. हे प्रशिक्षण
४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये बेसिक कॅमेरा सेटिंग, स्टुडिओ पोर्टेट,
मॉडेलिंग फोटो, टेबल टॉप फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी, स्टुडिओ सेट व लाइटिंग, व्हिडिओ
कॅमेरा सेटिंग याविषयी अद्ययावत मार्गदर्शन करण्यात आले.
फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीसाठी प्रशिक्षक म्हणून तज्ञ
प्रशिक्षिका धनश्री टेकाडे यांची निवड करण्यात
आली होती. संस्थेचे संचालक संदीप पोटे यांनी मूलभूत बँकिंग, बँकेची व्याख्या, बँकांचे
वर्गीकरण, ठेवीचे प्रकार, कर्जाचे प्रकार, मुद्रा कर्ज, सामाजिक सुरक्षा योजना याविषयी
सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रशिक्षक
स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक प्रशांत उबरहंडे, मनीषा देव, आणि कल्पना
पोपळघट यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरसेटी तर्फे बेरोजगार सुशिक्षित
तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी
इच्छुकांची सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे संपर्क साधण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.
000
Comments
Post a Comment