सिंदखेडराजा तालुक्यात प्रशासन गाँव की ओर मोहीमेंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप

 










सिंदखेडराजा तालुक्यात प्रशासन गाँव की ओर मोहीमेंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप

 

बुलढाणा, दि. 20(जिमाका) : केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहेत. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यात ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीमेचा दुसऱ्या दिवशी दि. 20  डिसेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तसेच तालुक्यातील इतर कार्यालय प्रमुखांच्या हस्ते ई- शिधापत्रिका, जातीचे दाखले व  विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.  तसेच यावेळी संबंधितांनी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली.      

         या ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेंतर्गत  प्रशासनातील विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करुन विविध सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारीं, अर्जांचा निपटारा करुन सेवांचा लाभ दिला जाणार आहे.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या