Posts

Showing posts from August, 2023

DIO BULDANA NEWS 31.08.2023

Image
  आयुष्मान भव मोहिमेत आबालवृध्दांची आरोग्य तपासणी *लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन बुलडाणा, दि. 31 : जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान आयुष्मान भव आरोग्य मोहीम राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सर्व वयोगटातील नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी या मोहिमेंतर्गत आबालवृद्धांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आयुष्मान आपल्या दारी ३.० या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमामध्ये आरोग्य विषयक सेवासुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड आणि आभा कार्डबाबत आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. यात असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळाव्यांतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा आदीबाबत जनजागृती करणे आणि आयुष्मान भारत आरोग्...

DIO BULDANA NEWS 29.08.2023

  खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये आहे. स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी   शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे ...

DIO BULDANA NEWS 28.08.202

Image
  नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा उत्सवाची सांगता बुलडाणा, दि. 28 : नेहरु युवा केंद्र आणि सहकार विद्या मंदिर यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा उत्सव शनिवार, 26 ऑगस्ट रोजी सहकार ऑडीटोरीयम येथे थाटात पार पडला. उत्सवाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुकेश झंवर, मृत्यूंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, गजेंद्र दांडगे, प्रा. हरीश साखरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानोबा कांदे, प्रा. सागर गवई, प्रा. डॉ. नंदकिशोर बोकाडे, प्रा. निता बोचे उपस्थित होते. आमदार श्री. गायकवाड म्हणाले, शहर सुंदर, स्वच्छ निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. झोपडपट्टीतील सामान्यवर्गातील 300 मुलांसाठी यावर्षीपासून सीबीएससी शिक्षण सुरु केले आहे. युवकांनी जात-पात-धर्म यापलिकडे जाऊन मानवता धर्म जोपासावा, असे आवाहन करून युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्राने घेतलेल्या युवा उत्सवाचे कौतुक केले. अप्पर जिल्हाधिकारी श्री. गीते यांनी राष्ट्रीय विकासाच्या कार्यात तरुणांनी पुढाक...

DIO BULDANA NEWS 26.08.202

 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा बुलडाणा, दि.26 : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रविवार, दि. 27 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  श्री. दानवे सकाळी 9 वाजता भोकरदन येथून निघून सकाळी 10 वाजता बुलडाणा येथे पोहोचतील. त्यानंतर सोनूने हार्ट आणि चाईल्ड केअर हॉस्पीटलचे उद्घघाटन करतील. दुपारी साडेबारा वाजता बुलडाणा येथून चिखलीकडे प्रयाण करतील. त्यानंतर चिखली येथून दिड वाजता जालनाकडे प्रयाण करतील. ००००

DIO BULDANA NEWS 25.08.2023

Image
  बुलडाणा येथे मंगळवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम *पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांची माहिती बुलडाणा, दि. 25 : शासन आपल्या दारी उपक्रमात जिल्हास्तरीय कार्यक्रम बुलडाणा येथे मंगळवार, दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. परिवहन महामंडळाच्या मागील कऱ्हाडे ले आऊट येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला 25 हजार लाभार्थी उपस्थित राहण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाले, शासनाच्या विविध विभागांसोबत महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगटांचा यात सहभाग असणार आहे. आतापर्यंत पाच लाख 75 हजार लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दिवशी आणखी दिड लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे....

DIO BULDANA NEWS 24.08.2023

  जिल्हा परिषदेच्या अनुकंपाधारकांची यादी प्रसिद्ध  बुलडाणा, दि. 24 : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अनुकंपाधारक उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर आक्षेप असल्यास दहा दिवसांच्या आत आक्षेप नोंदविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेची सन 2023 साठी अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारित ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या  ZPBULDANA.MAHARASHTRA.GOV.IN  या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती ज्येष्ठता यादीवर संबंधितांकडून लेखी आक्षेप मागविण्यात आले. प्राप्त आक्षेपाची पडताळणी करुन अंतिम ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. अंतिम ज्येष्ठता यादी दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम ज्येष्ठता यादीवर आक्षेप असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत या कार्यालयास लेखी सादर करावेत. सदर अंतिम यादीवर विहित मुदतीत आक्षेप प्राप्त झाले नसल्यास सदर यादी अंतिम समजण्यात येणार आहे. याची सर्व अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. 0000000

DIO BULDANA NEWS 23.08.2023

Image
  नवभारत साक्षरता कार्यक्रमात निरक्षराचे सर्वेक्षण *जिल्ह्यातील निरक्षरांचा नव्याने शोध बुलडाणा, दि. 23 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमात दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १२ लाख ४० हजार निरक्षर नागरिकांना शोधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण शिक्षण विभाग करणार आहे. शिक्षण विभागातर्फे शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी यांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी आवश्यक प्रपत्रेही पुरविण्यात आली आहेत. दरम्यान निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे आहे. शिक्षकांना प्रत्यक्ष वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वार्ड अशा ठिकाणी सर्वेक्षण करावयाचे आहे. निरक्षरांच्या सर्वेक्षणामध्ये निरक्षराचे नावे, लिंग, जात प्रवर्गनिहाय अद्याव...

DIO BULDANA NEWS 22.08.2023

Image
  शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करावा -जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते बुलडाणा, दि. 22 : शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन बुलडाणा येथे मंगळवार, दि. 29 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. यात शासकीय योजनांच्या लाभासह रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शासन आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी बी. एम. मोहन आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती विसुपते म्हणाल्या, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणताना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, एक क...