Friday 5 January 2024

शिष्यवृत्तीतील उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांनी सात दिवसात जमा करावी

बुलडाणा,दि.05(जिमाका):केंद्र शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाची 60 टक्के हिश्श्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यानंतर अनुज्ञेय निर्वाह भत्ता वजा करून उर्वरीत शिक्षण शुल्क, परीक्षा आणि इतर शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास 7 दिवसात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची सन 2021-22 व 2022-23 वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. खात्यात जमा झालेल्या रक्कमेतून अथवा काही दिवसात जमा होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या रकमेतून निर्वाहभत्याची 60 टक्के वजा करून उर्वरीत रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment