Tuesday 2 January 2024

मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांबाबत आक्षेप, हरकती आमंत्रित

बुलडाणा,दि.02(जिमाका): कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सुधारीत निकष लागू केले असून, त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील चोंढी तलाव हा लघुपाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत केला आहे. त्यामुळे प्राप्त संस्था नोंदणीच्या अनुषंगाने नाव राखून ठेवणे व बँकेत खाते उघडण्याचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संग्रामपूर तालुक्यातील चोंढी येथील नियोजित मोईन आणि जयभवानी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थासाठी मच्छीमारांना समान संधी मिळावी, या हेतूने 15 दिवसाची जाहीर नोटीस देवून आक्षेप व हरकती मागविण्यात येत आहेत. प्राप्त हरकतीवर संबंधिताचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांच्या अभिप्रायासह हे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त हरकतीवर कोणताही विचार केला जाणार नाही, असे सहायक निबंधक अ. वि. भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments:

Post a Comment