Saturday 6 January 2024

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

• डिजिटल क्रांतिमुळे क्रांतिकारी बदल • सिनगाव जहागीर, खामगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती बुलडाणा,दि.06(जिमाका): केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांना देण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात 'विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. या माध्यमातून देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय कामगार, श्रम, आणि पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर आणि खामगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत कार्यक्रमात श्री. यादव बोलत होते. आमदार श्रीमती श्वेताताई महाले, आमदार आकाश फुंडकर, कामगार व रोजगार मंत्रालयाचे संयुक्त सचिव रुपेश कुमार ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, सरपंच सुनिता डोईफोडे, माजी खासदार सुखदेव काळे, माजी आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, तोताराम कायंदे, विजयराज शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विविध आघाड्यांवर प्रगती करत आहे. केंद्र शासनाच्या लोकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, यासाठी देशभरात ही यात्रा सुरु असल्याचे सांगून श्री. यादव म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. देशातील संसाधने ही मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहचावीत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण नागरिकांना मिळाल्यास देश विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी व्यक्त केला. देशात स्वच्छता मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर दिला जात आहे. प्रधानमंत्र्यांनी देशात डिजीटल क्रांती घडवून आणल्यामुळे डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. देशात आज डिजिटल आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असून, शिक्षण, आरोग्य, विज्ञान- तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशात नवनवे बदल घडत असल्याचे श्री. यादव यांनी नमूद केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पाऊल उचलले आहे. देशात पक्के रस्ते, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून, विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री श्री. यादव यावेळी म्हणाले. सिनगाव जहांगीर येथे आमदार श्वेताताई महाले तर खामगाव येथील कार्यक्रमात आमदार ॲड. आका
श फुंडकर यांनी प्रास्ताविकातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची आपल्या समयोचित भाषणातून उपस्थितांना माहिती दिली. विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, रेशन कार्ड, जमीन आरोग्य पत्रिका वितरण, सेंद्रीय शेती, संजय गांधी निराधार अनुदान योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सिनगाव जहागीर येथील जनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पथनाटिकेतून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिल्याबद्दल श्री. यादव यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटविकास अधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले, तर बबन कुमरे यांनी आभार मानले. विकसित भारत संकल्प यात्रेतून विविध योजनांची जनजागृती आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री किसान सन्मान, किसान क्रेडीट कार्ड (केसीसी), प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, स्वामित्व, जन धन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम आणि नॅनो फर्टीलायझर, प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री विश्वकर्मा, इ-श्रम कार्ड आदी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आरोग्य विभागाच्या स्टॉलवर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कृषि विभागाच्या स्टॉलवर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, कृषि यांत्रिकीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महाडीबीटी पोर्टलवरील अर्जदारांची नोंदणी, मृदा-पाणी नमुना तपासणी, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट प्रकल्प), गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, एक रुपयात पिक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आदी योजनांची देण्यात आली. पशुसंवर्धन विभाग, स्वच्छ भारत मिशन, बँक, महिला व बाल विकास विभाग, पुरवठा विभाग, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत कार्ड) तसेच तहसील कार्यालयाच्या स्टॉलवर श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना, संजय गांधी योजना, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलीअर, राष्ट्रीय-वय-अधिवास प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, अल्प भूधारक शेतकरी दाखला आणि भूमिहीन दाखले यासह केंद्र शासनाच्या सर्वच योजनांची माहिती देण्यात आली.
*****

No comments:

Post a Comment