Friday 5 January 2024

नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतून जिल्हा 100 टक्के साक्षरतेसाठी प्रयत्न

बुलडाणा,दि.05(जिमाका):जिल्हा साक्षरतेसाठी अक्षर ओळख व अंकज्ञान निरक्षरांची नोंदणी करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे आणि जनजागृती करून निरक्षरांची नोंद गाव अथवा वार्ड किंवा जवळच्या शाळा मुख्याध्यापकांकडे करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने साक्षरता वर्ग घेण्यात येणार असून, नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्हा 100 टक्के साक्षरतेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (योजना) डॉ. वैशाली ठग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यभर नवभारत साक्षरता कार्यक्रम योजना राबविण्याचे धोरण स्वीकारले असून, दोन शासन निर्यणामध्ये योजनेचे स्वरुप व अंमलबजावणी पद्धती व नियंत्रण यंत्रणेची जबाबदारी विशद केली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील 15 वर्षावरील वयोगटातील सर्व निरक्षरांना 2027 पर्यंत साक्षर करण्याचे उद्दिष्ट असून, शाळा या योजनेचे एकक आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी यु-डाएस क्रमांकप्राप्त प्रत्येक व्यवस्थापनाची प्रत्येक माध्यमाची प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य विभागाचे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला व पुरुष बचत गट, माता व पालक संघ, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, एन.जी.ओ, इयत्ता 8 वी व त्यापुढे शिकलेला विद्यार्थी, व्यक्ती ग्रामपंचायत, सरपंचाच्या सहकार्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, यामध्ये स्वयंसेवकाला कोणतेही मानधन मिळणार नाही. साक्षरता वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहेत. प्रत्येक गाव, शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, संघटनात्मक कार्य करणारे व्यक्ती मराठी, उर्दू व इतर भाषांचे संवर्धनाकरिता कार्य करणारे कार्यकर्ते, ग्रंथालय चालकांनी अधिक माहितीसाठी 9049750031 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. *****

No comments:

Post a Comment