Friday 5 January 2024

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत शासकीय योजनांचा जागर

• विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती बुलडाणा,दि.05(जिमाका): विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या वंचित लोकांपर्यंत विविध योजनेचे लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे 26 जानेवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे. आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्वला योजना, पीएम विश्वकर्मा, पीएम किसान सम्मान, किसान क्रेडीट कार्ड (केसीसी), पीएम पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, स्वामित्व, जन धन योजना, जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम आणि नॅनो फर्टीलायझर आदी योजनांचा या यात्रेमुळे नागरिकांना लाभ उपलब्ध होणार आहे. या संकल्प यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय कामगार, श्रम आणि पर्यावरण, वने तसेच पर्यावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव हे उद्या, शनिवार (दि.6)पासून जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौ-यावर येत आहेत. केंद्रीय मंत्री श्री. यादव यांच्या हस्ते उद्या शनिवार (दि.6) रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील सिनगाव जागीर येथे सकाळी 10.30 वाजता केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या दालनाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार श्रीमती श्वेताताई महाले व सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी प्रास्ताविकातून विकसित भारत संकल्प यात्रेबाबतची माहिती दिल्यानंतर प्रतिज्ञा घेण्यात येईल. कार्यक्रमस्थळी केंद्र शासनाच्या प्रमुख विविध योजनांची चित्रफितीच्या माध्यमातून माहिती नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना योजनांचे लाभ वितरीत करण्यात येणार आहेत. यावेळी ‘मेरी कहानी मेरी जुबानी’च्या माध्यमातून लाभार्थी आपले मनोगत व्यक्त करतील. या अनुषंगाने आमदार राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करतील. सदर कार्यक्रमानंतर खामगाव नगर पालिका येथील कार्यक्रमात आमदार ॲङ आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे व श्रीमती श्वेताताई महाले आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी खामगाव तालुक्यातील जनुना येथे 2.30 वाजता ‘अटल आनंद वन घन वन योजना’ आणि ‘मियावाकी पद्धती’च्या घनदाट झाडांच्या प्रकल्पाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता वन परीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे लोकार्पण होईल. दुसऱ्या दिवशी रविवार (दि. 7) रोजी सकाळी केंद्रीय मंत्री श्री. यादव यांच्या हस्ते संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर येथे सकाळी 10.30 वाजता केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या दालनाचे उदघाटन आयोजित केले आहे. यावेळी माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे, ॲङ आकाश फुंडकर, श्रीमती श्वेताताई महाले आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करतील. संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जावून लाभ न मिळालेल्या वंचित नागरिकांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून, नाव नोंदणी करण्यात येणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी लाभ प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. ***** वृत्त क्रमांक : 02 दि. 05 जानेवारी 2024 केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचा बुलडाणा जिल्हा दौरा बुलडाणा,दि.05(जिमाका): केंद्रीय श्रम, रोजगार, वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांचे उद्या शनिवार (दि.6) रोजी छत्रपती संभाजीनगर येथून देऊळगाव राजा तालुक्यातील आनंदगड येथे सकाळी 9.40 वाजता आगमन होईल. ते सकाळी 10 वाजता सिनगार जहागीर येथे आगमन होईल. त्यानंतर श्री. देविदास महाराज संस्थान येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता तृप्ती लॉन्स, धोत्रा नांदई फाटा येथे आगमन व राखीव. धोत्रा नांदई फाटा येथून दुपारी 1 वाजता खामगाव तालुक्यातील जनुनाकडे प्रयाण करतील. केंद्रीय मंत्री श्री. यादव यांच्या हस्ते दुपारी 2.45 वाजता जनुना येथील अटल आनंदवन घन वन योजनेंतर्गंत वृक्षारोपण करतील. खामगाव येथील वन परीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे दुपारी 3 वाजता त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता जिल्हा परिषद मुलींची शाळा येथील आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6 वाजता गजानन महाराज परिसर येथे आगमन होईल. शेगाव येथे रात्री मुक्कामी असतील. केंद्रीय मंत्री श्री. यादव हे रविवार (दि.7) रोजी सकाळी 7.30 वाजता श्री. गजानन महाराजांचे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता शेगाव येथून बावनवीरकडे प्रयाण करतील. बावनवीर येथे आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता संग्रामपूर येथील जलजीवन मिशनच्या प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. त्यानंतर जळगाव जामोद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. *****

No comments:

Post a Comment