Tuesday 2 January 2024

स्वस्त दराने रेती मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

• नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास दराने साडेतीन हजार ब्रास साठा उपलब्ध बुलडाणा,दि.02(जिमाका): राज्यातील सामान्य नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ व हिवरखेड पुर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथे तर राहेरी खुर्दसाठी राहेरी खुर्द येथे डेपो कार्यान्वीत करण्यात आला आहे. त्यामुळे टाकरखेड वायाळ व राहेरी बु. डेपोमधून 3 हजार 670 ब्रास रेती सामान्य जनतेसाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे 600 रुपये प्रति ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाखनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवून शासनाच्या या धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment