राज्य परिवहन महामंडळात व्यावसायिक व आयटीआय उत्तीर्ण शिकावू उमेदवारांकरीता भरती; ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 राज्य परिवहन महामंडळात व्यावसायिक व आयटीआय उत्तीर्ण शिकावू उमेदवारांकरीता भरती; ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन


बुलडाणा,(जिमाका) दि. 4 :  राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा विभागामार्फत 2024-25 साठी तांत्रिक व्यावसायिक व आय.टी.आय. उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती करावयाचे आहे. त्याकरीता यांत्रिक मोटारगाडी, पत्रे कारागीर, ॲटो विजतंत्री, पेंटर, टर्नर, वेल्डर, वायरमन या व्यवसायांकरीता आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे. 


राज्य परिवहन महामंडळामध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल(MMV) (पद ८९) पात्रता- आयटीआय मेकॅनिक मोटार व्यवसाय उत्तीर्ण. मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर(MVBB) (पद ३०), पात्रता-आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण. ऑटो इलेक्टीशियन (पद 26), पात्रता-आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण, पेंटर (पद 6), पात्रता- आयटीआय पेंटर व्यवसाय उत्तीर्ण, टर्नर पदासाठी (पद 2),पात्रता- आयटीआय टर्नर व्यवसाय उत्तीर्ण.  वेल्डर (पद 13),पात्रता-आयटीआय वेल्डर व्यवसाय उत्तीर्ण, वायरमनसाठी (पद 10), पात्रता-आयटीआय वायरमन व्यवसाय उत्तीर्ण, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग (पद 7) पात्रता-आयटीआय मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग व्यवसाय उत्तीर्ण. वरील पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्यागटातील असावा. 


व्यवसायाकरीता आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprrenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी, रजिस्ट्रेशन केल्यानंतर पोर्टलवरील संकेतस्थळावर दिलेल्या सुचनांप्रमाणे M.S.R.T.C. BULDANA DIVISION या आस्थापनेकरीता ऑनलाईन अर्ज करावे. वरीलप्रमाणे ऑनलाईन  रजिस्ट्रेशन झालेल्या शिकाऊ उमेदवारीकरीता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरावे लागतील. छापील अर्ज आस्थापना शाखा, राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, बुलडाणा येथे दि. 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते 3  यावेळेत स्विकारले जातील. अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारांसाठी 590 रुपये तसेच मागासवर्गीय शिकाऊ उमेदवारांसाठी 295 रुपये इतकी असून शुल्क उमेदवाराने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्टद्वारे "M.S.R.T.C. FUND A/C BULDANA" या नावाने काढून अर्जासोबत सर्व कागदपत्रासह या कार्यालयास दि 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करावा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा विभागामध्ये शिकाऊ उमेदवारी करता येईल, याची नोंद घेण्यात यावी. 

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या