डाक विभागाचा उपक्रम; आर्थिक सक्षमीकरणाकरीता शक्ती उत्सव मोहिम

 

डाक विभागाचा उपक्रम; आर्थिक सक्षमीकरणाकरीता शक्ती उत्सव मोहिम

 

बुलडाणा, (जिमाका) दि.7: भारतीय डाक विभागामार्फत ग्राहकांसाठी आर्थिक सबलीकरण अंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ऑक्टोंबर महिण्याच्या कालावधीत नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभ पर्वावर नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता ‘शक्ती उत्सव’ विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा विभागात विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करून पीओएसबी खाते काढण्यात येणार आहेत.

          यामध्ये आवर्ती ठेव योजना, मुलींकरिता सुकन्या समृद्धी योजना, महिलांकरिता महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना, मासिक उत्पन्न योजना, जेष्ठ नागरीकांसाठी जेष्ठ नागरिक बचत योजना, पदवीधर तसेच शासकीय-निम शासकीय कर्मचारी यांना डाक जीवन बिमा व ग्रामीण भागातील रहिवासी करिता ग्रामीण डाक जीवन बिमा राबविल्या जातात. या विविध सेवाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जवळच्या डाक घराशी संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

                            000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी