निविष्ठा वितरणाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
निविष्ठा वितरणाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा,
(जिमाका) दि.4: अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान
गळीतधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे
वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आलेले आहे. निविष्ठा वितरण शेतकरी गटामार्फत राबविली
जाणार असून लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.
तरी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज दि. 6 ऑक्टोंबरपर्यंत करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
सन
2024-25 वर्षात हरभरा, गहू, जवस, करडई, भूईमुग
व मोहरी या पिकांचे महा डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात
येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके हि बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत. पीक प्रात्यक्षिकासाठी
एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्याचा दोन हेक्टर
मर्यादेत लाभ देय असणार आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड
महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी
महाडीबीटी पोर्टलवर औषधे व खते या बाबी अंतर्गत शेतकऱ्यांनी
mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत.
00000000
Comments
Post a Comment