मुंग, उडिद व सोयाबिन खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 मुंग, उडिद व सोयाबिन खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन


बुलडाणा, (जिमाका) दि. 3: यावर्षीच्या हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मुंग, उडिद व सोयाबिन खरेदी करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खरेंदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम.जी.काकडे यांनी केले आहे.


आधारभुत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने हमीदराने मुंग 8 हजार 682 रुपये, उडिद 7 हजार 400 रुपये,  सोयाबिन 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल या दराने होईल.  मुंग व उडिद नोंदणी व खरेदी दि. 01 ऑक्टोबर 2024 पासुन ते 7 जानेवारी 2025 पर्यंत तर सोयाबिनची नोंदणी दि. 1 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात आली असून खरेदी दि. 15 ऑक्टोबर 2024 ते 12 जानेवारी 2025  सुरु करण्यात येणार आहे. 


जिल्ह्यामध्ये मुंग, उडिद व सोयाबिन खरेदीसाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील 11 केंद्रांना मान्यता देण्यात आलेली असुन पुढील केद्रांना नोंदणी व खरेदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. (तालुका शे. सह. खरेदी विक्री समिती मर्या. बुलढाणा, मेहकर, शेगांव, लोणार, संग्रामपुर) सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र- साखरखेर्डा, स्वराज्य़ शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली केंद्र- चिखली, कृषि उत्पन्ऩ बाजार समिती, संग्रामपुर केंद्र - वरवंड बकाल, कृषि उत्पन्ऩ बाजार समिती, शेगाव केंद्र - माटरगांव, बिबी फार्मर प्रो. कंपनी, केंद्र - किनगाव जट्टू, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा या केंद्रांना मान्यता दिलेली आहे. 


शेतकऱ्यांनी खरेदी केद्रावर नोंदणी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसमएएस येतील त्या शेतकऱ्यांनी वरील संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन जावयाचे आहे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या