निवडणूक निरीक्षक निरीक्षक स्मिता सबरवाल, नरेश झा, सिमा सरकार बुलढाण्यात दाखल निवडणूक तयारीचा घेतला आढावा
निवडणूक
निरीक्षक
निवडणूक तयारीचा घेतला आढावा
बुलडाणा, (जिमाका) दि.28: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना राबवावी व मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी
समाजमाध्यमांचा वापर करावा, अशा सूचना बुलढाण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक
निरीक्षक (सामान्य) यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील निवडणूक
प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी
स्मिता सबरवाल, नरेश झा, सिमा सरकार यांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक बुलढाण्यात
दाखल झाले असून त्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी सुहासिनी गोणेवार, निवासी उपजिल्हाधिकारी
अजिंक्य घोडगे, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने मतदान जनजागृतीसाठी
स्वीप कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती
करावी. बुलढाण्यात मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. त्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वातून
खासगी संस्थांच्या सहभागाने मतदारांसाठी योजना सुरु करण्याची संकल्पना राबवावी. मतदारांपर्यत
पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करावा. मतदानाबाबत जाणीव जागृती करावी. निवडणूक
काळात दारु, अवैध रोकड वाटपाविरोधात गांभीर्याने कारवाई करावी त्यात गती आणावी. तपासणी
नाक्यावरील अधिकारी व कर्माचाऱ्यांनी कडक तपासणी करावी. मतदान केंद्रांवर सोयीसुविधा,
कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक स्मिता सबरवाल यांनी
केल्या.
निवडणूक निरीक्षकांनी यावेळी निवडणुकीच्या
अनुषंगाने प्रशासनाच्या तयारीची माहिती घेतली. यामध्ये मतदारसंघांची विभागणी, उमेदवारी
अर्ज, लोकसंख्या, सीमाभाग, मतदार संख्या, मतदार नोंदणी प्रक्रिया, गृहमतदान, सेवा मतदार,
मतदान केंद्र, वाढीव, वगळलेले व स्थलांतरित मतदार, स्वीप कार्यक्रम, वेबकास्टींग, ॲप,
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची सरमिसळ, वितरण, मनुष्यबळ, प्रशिक्षण, कंट्रोल रुम, मतमोजणी
केंद्र, माध्यम कक्ष, वाहतूक व्यवस्था, स्थिर सर्वेक्षण पथक, पोलीस मनुष्यबळ, वैद्यकीय
सुविधा, दारु व रोकड जप्ती, फ्रिबीज, कायदा व सुव्यवस्था आदी बाबींची आढावा निरीक्षकांनी
घेतला.
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, प्रक्रियेचे
होतेय वेबकास्टिंग - जिल्हाधिकारी
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. विविध माध्यमातून
मतदार जनजागृती केली जात आहे. प्रचार प्रसिद्धी केली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास
सुरुवात झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेचे वेबकास्टिंग केले जात आहे. उमेदवारी अर्ज
प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती येईल. प्रशासन सज्ज झाले आहे. सातही
मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीच्या अंतिम टप्प्यात निवडणूक निरीक्षकांनी
प्रशासनाच्या नियोजनाचे कौतूक करुन पुढील तयारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
०००
Comments
Post a Comment