रेशीमरत्न 2023 पुरस्काराने बुलढाणा येथील शेतकरी सन्मानित
रेशीमरत्न 2023 पुरस्काराने बुलढाणा येथील शेतकरी सन्मानित
बुलडाणा, (जिमाका) दि.9: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील महिला शेतकरी सौ. सविता प्रशांत कुळकर्णी या रेशीम उत्पादक महिला शेतकऱ्यास महाराष्ट्र शासनाच्या "रेशीमरत्न" प्रथम पुरस्काराने सोमवार 7 ऑक्टोबर 20204 रोजी अमरावती येथे सन्मानित करण्यात आले. तसेच बळीराम रामभाऊ कोठाळे, लांजुड ता. खामगांव हे द्वितीय पुरस्कार व नीतीन दशरथ ठाकरे, कल्याणा ता. मेहकर हे तृतीय पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले. सन्मानित शेतकऱ्यांना रेशमाची शाल, रेशमाची साडी, मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. सौ. सविता कुळकर्णी यांनी मागील 3 ते 4 वर्षापासून रेशीम उद्योगामुळे पारंपारिक शेतीमध्ये भरीव कामगिरी केली. त्याचबरोबर त्यांनी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेक शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यासाठी निःशुल्क माहिती देऊन रेशीम शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यांची 2022-23 च्या रेशीमरत्न पुरस्कारासाठी निवड केली होती. हा पुरस्कार अमरावती येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, रेशीम संचालनालयाचे संचालक तथा खासदार डॉ. अनिल बोंडे, विनय मून व उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांच्यासह आदि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
0000000
Comments
Post a Comment