भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी; 11 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी;

11 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि.4: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service selection Board या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी नाशिक येथे नवयुवक नवयुवतीसाठी दि. 14 ते 23 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत SSB कोर्स आयोजीत करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ईच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे दि. 11 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निशुल्क सोय करण्यात आलेली आहे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune यांच्या वेबसाइट SSB कोर्स क्रमांक 58 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय प्रिंट दिलेल्या किंवा व्हाटसॅप नंबर ९१५६०७३३०६ या मोबाइल नंबरवर SSB कोर्स क्रमांक 58 हा मेसेज केल्यास संबधित कोर्सची परीशिष्ट उपलब्ध करून दिली जाईल. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परीशिष्टची प्रिंट दोन प्रतीत सोबत घेऊन यावे.

कोर्ससाठी पात्रता : कंबाईंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन(NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत.  एनसीसी गृप हेडक्वार्टने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा इमेल आयडी training.petenashik@gmail.com किंवा दूरध्वनी क्रंमाक ०२५३-२४५१०३२, ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या