आरोग्य सेवक व कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्ती पत्र देऊन केले समुपदेशन
आरोग्य सेवक व कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्ती
पत्र देऊन केले समुपदेशन
बुलडाणा, (जिमाका) दि.4: जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक
(महिला) व ग्रामपंचायत विभागाअंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध
करण्यात आली होती. जिल्हा निवड समितीने पात्र ठरलेल्या उमेदवारांचे पदस्थापनेची प्रक्रिया
पारदर्शकपणे पार पाडणेकरिता 3 ऑक्टोबर रोजी समुपदेशन शिबीर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी कर्मचारांना नियुक्ती व पदस्थापना
आदेश देऊन समुपदेशन करण्यात आले.
जिल्हा परिषद
आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक(महिला) एकूण 199 पदांची जाहिरात दिली होती. त्यापैकी
जिल्हा निवड समितीने पात्र ठरविलेल्या 91 उमेदवारांना आरोग्य सेवक ( महिला) या पदावर
नियुक्ती देणे. तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाअंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक संवर्गाची
36 पदांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यापैकी जिल्हा निवड समितीने पात्र
ठरविलेल्या 33 उमेदवारांना कंत्राटी ग्रामसेवक या पदावर नियुक्ती देऊन दोन्ही संवर्गातील
उमेदवारांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेशन शिबीर आयोजन करण्यात आले होते. समुपदेशनामध्ये पदस्थापनेसाठी
निवड केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समितीमध्ये रुजु होणेकरीता समुपदेशन
शिबीरामध्येच नियुक्ती व पदस्थापना आदेश निर्गमित केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन,
प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी. एंडोले (सामान्य), उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य)
संजय इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते आदी उपस्थित होते.
000000
Comments
Post a Comment