मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना; पहिल्या विद्यावेतनाचे पंतप्रधानाच्या हस्ते ऑनलाईन होणार वाटप लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना; पहिल्या विद्यावेतनाचे पंतप्रधानाच्या हस्ते ऑनलाईन होणार वाटप

लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलडाणा, (जिमाका) दि.4:  राज्य शासनाव्दारे सुशिक्षीत बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत सुशिक्षीत रोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पहिल्या विद्यावेतनाचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 5 ऑक्टोंबर रोजी ठाणे येथील कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन तसेच शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद, बुलढाणा येथे शनिवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2.30 वाजता होणार आहे. या कार्याक्रमास जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या