निवृत्ती वेतनधारकांचा संवाद मेळावा संपन्न; मान्यवरांनी केले मार्गदर्शन
निवृत्ती
वेतनधारकांचा संवाद मेळावा संपन्न; मान्यवरांनी केले मार्गदर्शन
बुलडाणा, (जिमाका) दि.16: शासनसेवेतून वयोमानानुसार निवृत्ती वेतनधारकांचा
संवाद मेळावा नुकतचा जिल्हा कोषागार कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी
जेष्ठ नागरिकांच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन करुन निवृत्ती वेतन रक्कमेच्या गुंतवणुकीबाबत
माहिती दिली.
निवृत्ती वेतन संवाद मेळाव्यासाठी निवृत्तीवेतनधारक पेन्शन संघटनेचे
जिल्हा अध्यक्ष व सदस्य प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच जिल्हा विधी प्राधिकरण
सचिव नितीन पाटील, भारतीय स्टेट बँकेचे राजे व. बोहरा, अप्पर कोषागार अधिकारी बबनराव
इटे उपस्थित होते.
जिल्हा निवृत्ती वेतनधारक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. पहाड यांनी वेतनधारकांच्या
समस्या, अडचणी सांगीतल्या. जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे यांनी निवृती वेतनधारकांच्या
शंकाचे निरसन केले. तसेच पेन्शन धारकांकडून प्राप्त तक्रारी लेखी व तोंडी निवेदनाचे
निवृत्ती वेतन शाखेतील कर्मचाऱ्यांनी निराकरण केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना श्रीकृष्ण भराड यांनी केले.
सुत्रसंचालन राहुल अमर भोलाने यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मिना योगेश वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठो
श्रीमती. सविता अढाव, जिवन काळे श्रीमतों,
तृप्ती सरोदे, विनोद घट्टे, भास्कर नाटेकर,
सचिन पाटील, श्रीमती प्रिती मांडवेकर, श्रीमतीह साधना माटे, नवनाथ बुनगे तसेच कोषागार
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
00000
Comments
Post a Comment