राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि.7: राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेतंर्गत जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. सुधारित शासन निर्णयानुसार कलावंताना ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जेष्ठ साहित्यिक व कलावंतानी  ऑनलाईन अर्ज दि. 28 ऑक्टोंबरपर्यंत परिपुर्ण प्रस्ताव तालुकानिहाय गटविकास अधिकारी येथे सादर करावा, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

 

       योजनेचा लाभ घेऊ इच्छीनाऱ्या  कलावंतांनी https://mahakalasanman.org/pgeApplication FromForUser.aspx या लिंकवर ऑनलाईन परिपुर्ण अर्ज भरलेल्या प्रस्तावाची प्रत प्रस्तावास जोडुन तालुकानिहाय गटविकास अधिकारी पंचायत समित्ती येथे अर्ज दोन प्रतित उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जातील नमुद अटींची पुर्तता करणाऱ्या व आवश्यक कागदपत्रांच्या छाननीअंतीच्या पुरावा कागदपत्रासह सादर केलेले वैध अर्ज स्विकारले जाईल. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपुर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या