निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी - पोलीस निवडणूक निरीक्षक गुरमितसिंग चौहान बुलढाण्यात दाखल ; पोलीस प्रशासनाच्या तयारीचा घेतला आढावा

 

निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी

- पोलीस निवडणूक निरीक्षक गुरमितसिंग चौहान

 

बुलढाण्यात दाखल ; पोलीस प्रशासनाच्या तयारीचा घेतला आढावा

 

 

बुलढाणा, दि.29 (जिमाका): जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी. त्यासाठी पोलीस प्रशासनाने जबाबदारीपूर्वक काम करावे, असे निर्देश पोलीस निवडणूक निरीक्षक गुरमितसिंग चौहान यांनी पोलीस प्रशासनाला दिले.

 

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून नेमलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी गुरमितसिंग चौहान बुलढाण्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

 

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजिंक्य गोडगे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॅा. पराग नवलकर आदी उपस्थित होते.

 

पोलीस प्रशासनासह आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी व समस्या असल्यास त्या पोलीस निवडणूक निरीक्षकांकडे करता येणार आहेत. त्यासाठी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंतच्या वेळेत शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे भेटीसाठी उपलब्ध राहणार असून ९३५६३४४९५२ या भ्रमणध्वनींवर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निवडणूक निरीक्षक श्री. चौहान यांनी केले आहे.

 

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या