अवैध रोख रक्कम, दारू, गांजा विरुद्ध तक्रार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अवैध रोख रक्कम, दारू, गांजा विरुद्ध तक्रार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

बुलढाणा, दि.29 (जिमाका): जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या निवडणूक काळात अवैध रोख रक्कम (रोकड), दारु, ड्रग्ज, गांजा आदींचा गुप्त साठा, वितरण आणि वाहतुकीविषयी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैधरित्या दारु, रोख रक्कम (रोकड), गांजा, ड्रग्ज आदींचा गुप्त साठा, वाहतूक आणि वितरण केले जात असल्याच्या घटना घडतात. याविरुद्ध कारवाई करण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. सुजाण नागरिकांनी अशा घटना निदर्शनास आल्यास प्रशासनाला तत्काळ कळवावी. याशिवाय आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी सीव्हिजील ॲप उपलब्ध केला असून त्याद्वारेही तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी केले आहे.

 

सीव्हिजील ॲप येथून डाऊनलोड करता येईल:

https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil

 

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या