पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना; 16 ऑक्टोंबरपर्यंत योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविले

 

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना; 16 ऑक्टोंबरपर्यंत योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविले

 

बुलडाणा, (जिमाका) दि.7: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत जिल्हा वार्षीक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षात पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यात 20 पारधी/फासेपारधी समाजाच्या लाभार्थ्यांच्या घरी पारेषण संलग्न सौर ऊर्जा निर्मिती नेट मिटरिंगसह बसवूण देण्याचे लाभ देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरीता पारधी किंवा फासेपारधी समाजाच्या जमातीच्या लाभार्थ्यांनी 16 ऑक्टोंबरपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. योजनेचा छापील अर्ज लाभार्थ्यांना विनामुल्य देण्यात येईल. तसेच मुदतीनंतर प्राप्त अर्ज स्विकारण्यात येणार नाही यांची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी,असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी,अकोला यांनी कळविले आहे.

 

आवश्यक कागदपत्रे : पारधी/फासेपारधी जमाती जातीचा दाखला प्रमाणपत्र,  आधारकार्ड, बँक खाते क्रमांक, दारिद्ररेषेचे प्रमाणपत्र असल्यास, तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला रेशनकार्ड, विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र,  दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, परितक्त्या असल्यास नोटरी पुरावा, शैक्षणीक पात्रता शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईज दोन फोटो, इमारतीचा प्रकार आरसीसी किंवा स्लॅब किंवा टिनशेड बांधकामचा नकाशा. इमारतीची जागा स्वमालकीची असावी, नमुना 8 अ किंवा या आधी सौर प्रकल्प आस्थापीत आहे किंवा नाही.  इमारतीची ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका कर पावती जोडवी. स्वताचे नावावर असलेले इलेक्ट्रीक बिलाची छायांकित प्रत.

000000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या